सुधाकरपंत परिचारक यांचे अस्थि कलशाचे दर्शन
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर पांडुरंगाचे सेवाधारी, शेतकऱ्यांचे खऱ्याअर्थाने पांडुरंग म्हणजेच पंढरी नगरीचे सहकारातील परिसस्पर्श लाभलेल्या माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांची चंद्रभागा माईच्या पोटात चिरविश्रांती. शेकडो कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या पात्रात प्राचार्य मिलिंद परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते अस्थिविसर्जन करण्यात आल्या. छायाचित्रातून विविध गावातून, ग्रामीण भागातून नागरिकांच्या दर्शनासाठी अस्थीची पदयात्रा तालुक्यातून सकाळी परिचारक यांचे वाड्यावर आल्यावर त्या अस्थी एकत्र करून घरापासून विठ्ठल मंदिराकडे जाताना, विठ्ठल मंदिरासमोर परिचारक यांच्या अस्थि ठेवून आरतीने विसर्जनासाठी चंद्रभागे कडे अस्थी नेताना मिलिंद परिचारक व कार्यकर्ते नावेतून चंद्रभागेच्या उदरात पांडुरंगाच्या सेवाधारी अर्थात सामान्य पासून श्रीमंता पर्यंत पांडुरंग अनंतात विलीन झाले.






