Maharashtra

अमळनेर नगरपरिषदेचा गजब कारभार…सध्या सुरू आहे मेरी मर्जी…. चोराच्या हाती किल्ल्या…अग्निशामक चा कोणताही कोर्स झालेला नसताना दिला अग्निशामक खात्याच्या प्रमुख पदाचा कारभार….

अमळनेर नगरपरिषदेचा गजब कारभार…सध्या सुरू आहे मेरी मर्जी….
…अग्निशामक चा कोणताही कोर्स झालेला नसताना दिला अग्निशामक खात्याच्या प्रमुख पदाचा  कारभार….

अमळनेर नगरपरिषदेचा गजब कारभार...सध्या सुरू आहे मेरी मर्जी.... चोराच्या हाती किल्ल्या...अग्निशामक चा कोणताही कोर्स झालेला नसताना दिला अग्निशामक खात्याच्या प्रमुख पदाचा कारभार....

अमळनेर येथील नगरपरिषदेच्या अजब गजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. उद्या मुख्यमंत्री यांचा दौरा असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच विभाग तैनात करण्यात येत आहेत. यादृष्टीने अमळनेर नगरपरिषदेने  देखील तयारी सुरू केली असून अग्निशामक विभागावर नितीन खैरनार यांची नियुक्ती मुख्याधिकारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे नितीन खैरनार ह्यांचा कोणत्याही प्रकारचा अग्निशामक दला साठी लागणारा कोर्स झालेला नाही. परंतु नितीन खैरनार हे मुख्याधिकारी यांच्या खास जवळचे व्यक्ती आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी कोर्स नसताना सोपविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्याधिकारी यांना दि 23 आणि 24 ऑगस्ट 2019 मुख्यमंत्री दौऱ्या संदर्भात अग्निशामक बंच प्रशिक्षित अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत असे आदेश प्राप्त झाले आहेत. यानुसार अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी प्रशिक्षित नसलेल्या नितीन खैरनार यांना अग्निशामक बंच एम एच 19 एम 9399 पुरेसे इंधन घेऊन फरशी रोड येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर नगरपरिषद कोर्ट लिपिकाचे कामही नितीन खैरनार यांच्या कडे 23 ऑगस्ट पासून सोपविण्यात आले आहे.त्यांच्या कडील अतिरिक्त वरिष्ठ लिपिकाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. एकूणच काय सध्या नगरपरिषदेत मेरी मर्जी असा कारभार सुरू आहे. तुम्ही फक्त अधिकाऱयांच्या मर्जीतले असले पाहिजे मग तुमचा कोर्स झालेला असो नसो तुम्हाला महत्वाची कामे मिळणारच….अस साध्य वातावरण आहे…. जर दौऱ्या दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडला तर अप्रशिक्षित अग्निशामक प्रमुख आणि मुख्याधिकारी काय उत्तर देणार आहेत कोण जाणे….??????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button