Chopda

तालुक्यात प्रत्येक घरोघरी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप करणे बाबत मागणीचे चे तहसीलदार यांना निवेद

तालुक्यात प्रत्येक घरोघरी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप करणे बाबत मागणीचे चे तहसीलदार यांना निवेद

लतीश जैन

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड व प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तहसीलदार यांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप करणे बाबत मागणी चे निवेदन तालुका पदाधिकारी च्या वतीने देण्यात आले.

सदर निवेदनात कोव्हिड 19, कोरोना सारख्या वेश्र्विक महामारी विषाणूचे वाढते संक्रमण व त्यावर कुठल्याही प्रकारची लस तयार नसल्यामुळे आणि तसेच संपूर्ण राज्यात लॉकडाऊन मध्ये झालेली स्थितीलता यामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

लॉकडाऊन 5 या मध्ये रेड झोन वगळता जवळ जवळ सर्वच प्रकारची सूट असल्यामुळे आणि त्या मुळे होणारे दैनंदिन व्यवहार या साठी आता सर्वच जण घरामधून बाहेर पडू लागले आहेत, त्याच प्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता जिल्हा बॉर्डरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारची परमिशन न घेता ये जा करू शकतात.

2 महिन्यापासून त्या आधिक काळापासून लॉकडाऊन असल्यामुळे, वेळो वेळी लॉकडाऊन मध्ये होणारे बदल, सूट या मुळे कोरोना रुग्णांमध्ये भर पडत आहे.
सर्व जिल्हे, तालुके, शहर व गाव हे या पासून आता बाधित होत आहेत.
तरी आता पावसाळा सुरू होईल व आजारांचे, साथींचे प्रमाण वाढेल त्या मध्ये ताप, सर्दी, खोकला हि कोरोना सारखीच लक्षण असणारी आजार, रुग्ण होतील. व दवाखान्यात ह्याचा विपरीत परिणाम सुद्धा होवू शकतो, आधीच मागील 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधिपासून डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत व हा अतिरिक्त त्रास त्यांना सहन करावा लागू शकतो.

म्हणून त्या आधीच आपण कोव्हिड 19, कोरोना सारख्या वेश्र्विक महामारी विषाणू साठी व पावसाळा सुरू होउन होणारे आजार, व्हायरल इन्फेकशन या साठी संपूर्ण तालुक्यात प्रत्येक घरोघरी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप करणे बाबत मागणीचे चे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी,जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी शहर अध्यक्ष दशरथ तायडे, शहर उपाध्यक्ष रोहित माळी, शहर सचिव विठ्ठल माळी तालुका अध्यक्ष राजेंद्र माळी तालुका उपाध्यक्ष अलकेश माळी माळी,कार्याध्यक्ष महेंद्र माळी, सहसंघटक राकेश माळी,प्रसिद्धी प्रमुख गौरव माळी,राहूल माळी,प्रदीप माळी,समाधान माळी, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button