लाँकडाऊन काळातील वीजबील माफीसाठी विंचूर पत्रकार संघाचे निवेदन
येवला प्रतिनिधी विजय खैरनार
येवला: ता.२६ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात लाँकडाऊन करण्यात आले. या कालावधीतील वीजबील माफ करण्यात यावे अशी मागणी विंचूर पत्रकार संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
लाँकडाऊन कालाधीत नागरिकांचे व्यवसाय बंद होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनी तसेच सरकारकडून वीजबील माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच वीजपुरवठ्यात असणार्या तांत्रीक अडचणी दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, विंचूर येथे वीज कर्मचार्यांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
विंचूर सबस्टेशनचे शाखा उपअभियंता श्री. जाधव यांना हे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार किशोर पाटील, डी.बी.काद्री, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, प्रकाश जाजू, भाऊसाहेब हुजबंद, संदिप शिरसाट, दिपक घायाळ, कर्मचारी शिंदे आदि उपस्थित होते.






