Maharashtra

पारोळ्यात ‘तरुणाई’ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ !

पारोळ्यात ‘तरुणाई’ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ !

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

मनन बहुउद्देशीय संस्थेचा अभिनव उपक्रम;परिसर झाला चकचकित

येथील मनन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विविध भागांची स्वच्छता करण्यात येवून तरूणांनी स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ !मनन बहुउद्देशीय संस्था नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून सातत्याने नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित असते. उपक्रमातून सामाजिक संदेश देत असतात परिणामी समाजात त्यांचे सुपरिणाम निदर्शनास येतात.त्याचाच एक भाग म्हणून मनन बहुद्देशीय संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समाजाभिमुख उपक्रम अर्थात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.त्यात साईबाबा मंदिर,मडक्या मारोती चौक,जुलूमपुरा मंदिरासह बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली.परिणामी परिसर चकचकीत झाल्याचे पहावयास मिळाले.

पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ !

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन,सचिव राजेश नागपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश वाणी, नगरसेवक तथा आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान,नगरसेवक तथा गटनेते बापू महाजन,तलाठी जितेंद्र जोगी,खंडू बाविस्कर,प्रभाकर शिंपी, प्रा.विकास सोनवणे,अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर भोसले,राष्ट्रवादी आयटीसेल चे गणेश पाटील,तेली समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी,राहुल बडगुजर,गुरुदास महाजन,ऋषिकेश चव्हाण,परेश महाजन,संतोष जोगी,ईश्वर जोगी,किरण नागपुरे,राहुल बारी,योगेश जोगी आदी उपस्थित होते.

–तरुणाईने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ
मनन बहुद्देशीय संस्थेच्या उपक्रमात तरुणाईने उत्सुर्फ सहभाग नोंदवत गुटखा,तंबाखू,सिगारेट व अन्य व्यसनाच्या आहारी जाणार नाही तसेच परिसर नेहमी स्वच्छ ठेवणार अश्या आशयाची सामूदायिक रीत्या शपथ घेतली.

–मनन संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद
मनन संस्थेने प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर स्वच्छता अभियान राबविले त्यात स्वच्छते बाबत जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.सोबतच स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची शपथ तरूणांनी घेतली. हा उपक्रम कौतुकास्पद असून नगरपालिकेला संस्थेने सहकार्य केले असून प्रत्येक नागरिकाने आपल्या सभोवताली परिसर स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक तथा आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button