Pandharpur

आ गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आ गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी रफीक आत्तार

बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत सकल धनगर समाज पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ श्रीकांत देवकते जिल्हा परिषद सदस्य रामदास आप्पा ढोणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर प्रा सुभाष मस्के शहराध्यक्ष बबन येळे उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत कोरोना या गंभीर आजाराने अनेक रुग्ण राज्यभर दगावत आहेत याची दखल घेऊन या रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून पंढरपूर येथील जटा बाई धर्मशाळा पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरा निमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला आला पंढरपूर तालुका व शहर येथील सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळपास 138 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पंढरपुर रक्त ब्लड बँक सर्व डॉक्टर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बीराप्पा मोठे धनंजय बनसोडे नितीन काळे अनिकेत मेटकरी संजय माने सचिन शिंदे धनु पाटील अण्णा सलगर नाना खांडेकर शितल येळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button