Dharangaw

प्रजासत्ताक दिनी रंगला सन्मानाचा सोहळा

प्रजासत्ताक दिनी रंगला सन्मानाचा सोहळा

किरण चव्हाण

धरणगाव-(दि 26) इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव आणि प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ पूर्वी सकाळी प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते प्रजासत्ताक दिनाच्या घोषणेने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

प्रजासत्ताक दिनी रंगला सन्मानाचा सोहळा

यावेळी सविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले विद्यालयातील उपशिक्षक किरण चव्हाण यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केलं व नंतर ध्वजारोहण गटशिक्षणाधिकारी ए पी बाविस्कर यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन डी जी पाटील, पंचायत समिती धरणगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे संस्थेचे सचिव सी के पाटील ,संस्थेचे ज्येष्ठ संचालक मोहनदादा जैन, संस्थेचे संचालक भरत पाटील ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बळवंत पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते
सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षांमध्ये वर्षभरातून रंगलेल्या विविध स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आज सन्मान करण्यात आला.

वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्ध, रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,क्रीडा स्पर्धा ,क्रिकेट स्पर्धा यासह दहावी, व बारावीच्या परीक्षा मधून विशेष प्राविन्यात उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी गुणगौरव केला
गुणवंत झालेले एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांना मेडल ,चषक, शिल्ड, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षक डी एन पाटील यांनी केले होते व प्रास्ताविक प्रा जी पी चौधरी यांनी केले तर बक्षिस वितरण समारंभात सूत्रसंचालन डी एम पाटील, प्रास्ताविक पर्यवेक्षक ए एस पाटील यांनी तर आभार एन बी पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button