रा गे शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन
सुरेश बागडे
परांडा:- ( सा.वा )दि. 25
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आज दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ दीपा सावळे उपस्थित होत्या तर व्यासपीठावर सांस्कृतीक प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे ,प्रमुख पाहुणे प्रा सज्जन यादव ,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विशाल जाधव ,ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ राहुल देशमुख आदी उपस्थित होते. या वकृत्व स्पर्धेमध्ये वरिष्ठ विभागातील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये मानसी बनसोडे ,हलीमा मुजावर, कुंभार पूजा, अतिका पठाण, पवार जनाबाई, बालिका जाधव, मिश्रा सपना कारंडे या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ विशाल जाधव व प्रा सज्जन यादव यांनी काम पाहिले .परीक्षकांच्या परीक्षणानंतर त्यांनी दिलेल्या निकालांमध्ये मुजावर हलीमा बीएससी प्रथम वर्ष या विद्यार्थीनीने पहिला क्रमांक पटकाविला पूजा कुंभार बी.एस्सी तृतीय या विद्यार्थिनीने दुतिय क्रमांक पटकविला, तर मानसी बनसोडे हिने तृतीय क्रमांक पटकविला यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले .
या स्पर्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ,शिक्षणमहर्षि गुरुवर्य रा. गे शिंदे महाविद्यालय आणि तहसील कार्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना मतदानाचे महत्त्व कळावे ह्या हेतूने सदर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रमूख पाहूणे प्रा सज्जन यादव यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सांगीतले कि विद्यार्थानी मतदानाचे महत्व पटवून घेतले पाहिजे,देशाचे नेतृत्व करणे खूप महत्वाचे आहे ते०हा ते नेतृत्व चांगल्या गूनवान,चारि>यवान व उच्चशिक्षित ०यकतीकडे दिले तर देशाची प्रगती होईल यासाठी आपल्या मताची गरज आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या 61 व्या स्थापना दिनी 2011 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात करण्यात आली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी या दिवसाची सुरुवात केली भारतीय लोकशाहीमध्ये मतदार हा नेहमीच राजा राहिलेला आहे आणि मतदाराला आपले राष्ट्रीय कर्तव्य सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो . अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे म्हणाल्या की राष्ट्रीय मतदार दिन हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे विद्यार्थ्यांना मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये देशाविषयी प्रेम व्यक्त व्हावे आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी व आपले हक्क माहीत व्हावे मतदानाची किंमत कळावी यासाठी या मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी मानले.






