औसा तालुक्यातील कार्ला गावात जातीय वाद्यनी मुलीच्या प्रेम प्रकरणातील बौद्ध प्रियकराची केली हत्या
प्रतिनिधि : लक्ष्मण कांबळे लातूर
लातुर : औसा तालुक्यातील कार्ला हे जेमतेम लोकसंख्य असलेले हे गाव असून या गावात अनेक जाती धर्माचे लोक असतात तसेच बौद्ध समाज ही आहे या समाजाची मोजकेच घरे आहेत या गावातील गौतम कांबळे याचे ही घर आहे हे मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होते गौतम कांबळे यांचा मुलगा सुधीर कांबळे याला शाळा शिकऊन मोठे करायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आई वडिच्या स्वप्नांवर जातीयवादी लोकांनी घातला घाला
सविस्तर वृत्तांत
सुधीर गौतम कांबळे यांचे गावातील एका सुवर्ण जातीतील वैष्णवी घोडके नावाच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते हे गौतम व वैष्णवी हे प्रेम प्रकरण गावातील अनेकांना याची माहिती झाली हळूहळू याची माहिती ही वैष्णवी च्या घरच्यांना ही माहिती झाली तेव्हा पासून वैष्णवी चे नातेवाईकांनी सुधीर कांबळे याला गेली चार वर्षांपासून जातीवाचक शिविगाळ करणे जीवे ठार मारण्याची धमकी देने असा प्रकार अनेकदा घडला होता या मुळे सुधीर चे आई वडील पुणे येथे कामधंद्याच्या निमित्ताने गेले होते पण सध्या कोरोनाच्या काळात गावात असले मुळे सुधीर हा पुणे येथून अधून मधून गावाकडे यायचा त्या मुळे तिच्या नातेवाईकांना राग मनात धरून अनेकदा सुधीर ला जातीवाचक शिविगाळ करत धमक्या देत वेळोवेळी मनसीक त्रास देत होते दिनांक ११/११२०२०रोजी ही वैष्णवी चे नातेवाईक यांनी अंदाजे संध्याकाळी ९वाजता च्या सुमारास ही माझ्या घराचे समोर येऊन माझा मुलगा सुधीर कांबळे याला जीवे ठार मारण्याची धमकी देत आम्ही उद्या वैष्णवी चे लग्न करणार आहोत तरी तू काय करणार असे म्हणत असताना येथील काही लोकांनी माध्यस्थीकरून त्यांना घरी पाठवले होते व दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक १२/११/२०२० रोजी सुधीर हा घरात आई वडिल जेवण करून हे सर्वजण झोपले असता संध्याकाळी आमचा मुलगा सुधीर कांबळे याला संध्याकाळी कोणाचा तरी फोन आला होता त्या वेळेस मी राजाबाई कांबळे आई विचारले की एवढया संध्याकाळी कुठे चाललास तर थोडस बाहेर जाऊन येतो म्हणून गेलेले सुधीर हा पुन्हा घरी आलाच नाही सकाळी उठल्यावर गावात नागोबाच्या मंदिर समोरच्या वडाच्या झाडाला कोणतरी फाशी घेतले आहे असे समजताच माझ्या मनात पालचुकचुलकी की तो सुधीर तर नसेल ना नंतर समजले की सुधीर च आहे त्यावेळी नातेवाईक यांनी एकच हंबरडा फोडला की सुधीर ची आत्महत्या नसून तो घात आहे
या सर्व घटनेची माहिती किल्लारी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस बंदोबस्तात बॉडी पोस्टमार्टेम साठी गेली असता सुधीर चे आईवडील व नातेवाईक यांनी आरोपीला जो पर्यंत अटक होत नाही व सुधीरच्या मारेकऱ्यांवर ३०२गुन्हा दाखल करून अनुसूचित जाती जमाती आत्याचार कायद्या नुसार गुन्हा दाखल करणार नाही तो पर्यंत सुधीर ची बॉडी घेणार नाही म्हणत सकाळ पासून संध्याकाळी उशिरा पर्यंत एफ आर दाखल करण्यात आला नव्हता आंबेडकरी चळवळीचे अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून सुधीर च्या मारेकऱ्यावर ३०२ गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह केला असता ही पोलिसांनी मात्र सुधीर च्या हत्येला आत्महत्या दाखवत मारेकऱ्यावर ३०६, १४३, ३२३,५०४,५०६ , ३ (१) r, ३(१)s ३(२)va या कलमाखाली उशिरा गुन्हा दाखल केला आहे पण आई वडील व नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार १)शंकर सुरेश घोडके, २)राजू सुरेश घोडके,३) ओम सुरेश घोडके,४) गणेश शंकर घोडके, ५)सुरेश बंडापा घोडके यांचे वर (३०२) हा गुन्हा किल्लारी पोलिसांनी गुन्हा दाखल ना करता आमची फसवणून करून गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत असा आरोप मयत सुधीर कांबळे याचे नातेवाईक व आई वडील करत आहेत
सुधीर कांबळे याची आत्महत्या नसून त्याची वरील पाच आरोपीने हत्या केलीली आहे तरी वरील पाच आरोपी बरोबर वैष्णवीला ही सह आरोपी करावे असे त्याच्या नातेवाईक व आई वडील व मित्र परिवाराची मागणी आहे
हत्या करून आत्महत्या केले आहे असे म्हणत अजून किती सुधीर ला मारणार आहेत






