Nashik

कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ ओझर नामकरण समितीने घेतली नाशिक चे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगनराव भुजबळाची भेट दादासाहेब गायकवाड नाव देण्याची निवेदनद्वारे मागणी.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ ओझर नामकरण समितीने घेतली नाशिक चे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगनराव भुजबळाची भेट दादासाहेब गायकवाड नाव देण्याची निवेदनद्वारे मागणी.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : आज दि.2 जुलै 2021 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ (ओझर) नामकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली नाशिक चे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगनराव भुजबळ साहेबांची भेट घेतली.
सन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत आणि रशिया या देशाची मैत्री होऊन लढाऊ मिग विमानांचा कारखाना भारतात उभारण्याचे ठरले असतांना तो बंगलोर येथे होणार हे कळताच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भारताचे तात्कालीन संरक्षणमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांना आग्रह करून हा विमान कारखाना नाशिकला ओझर येथे उभारण्यास मंजुरी मिळवली. त्यालाच आपण एच.ए.एल. कारखाना असे म्हणतो. या कारखान्याचाच एक भाग म्हणून ओझर विमानतळ सुरू करण्यात आले आहे.
या सर्व मूळ प्रक्रियेमध्ये मा.दादासाहेब गायकवाड यांचा सहभाग असल्यामुळे व ते या भागाचे भूमिपुत्र असल्याने,त्याकाळात या संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून(खासदार) काम केल्याने व सध्या या विमानतळाला कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रस्तावित नसल्याने आम्हा सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे की, या विमानतळाला
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देवून या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढेल.अशा मागणीचे निवेदन भुजबळ साहेबांना देण्यात आले.
पालकमंत्री यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद देवून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे ओझर येथील विमानतळास नामकरण करणे बाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेते
*अण्णासाहेब कटारे,बाळासाहेब जी शिंदे,विलास जी पवार,दि.ना.उघाडे,दिपचंद नाना दोंदे,मदन अण्णा शिंदे,आदेश भाऊ पगारे,अनिलजी आठवले,कैलासजी पगारे,बाळासाहेब साळवे, दिलीप जी आहिरे,ओंकारजी देहाडे,प्रशांत भाऊ कटारे,
आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button