जिल्ह्यात आज नवीन 244 कोरोना बाधित रुग्ण आढळले..तर रुग्णसंख्या 8849 वर पोहचलीय!
रजनीकांत पाटील
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 160 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 5630 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2779 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 244 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 8849 झाली असून आतापर्यंत 440 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.






