Pandharpur

श्रीकांत शिंदे यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसने केले शेतकऱ्यांना मोफत मकेचे बियाणे वाटप

श्रीकांत शिंदे यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेसने केले शेतकऱ्यांना मोफत मकेचे बियाणे वाटप

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप करण्यात करून वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, आमदार भारतनाना भालके यांनी सूचना केल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे संकट उभे असताना खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने डिजिटल बोर्ड,विविध कार्यक्रम न करता शेतकऱ्यांना आधार देण्याच्या हेतूने आम्ही पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फुल न फुलांची पाकळी म्हणून आज मकेचे बियाणे देत आहेत. नेत्यांचे वाढदिवस म्हटले की कार्यकर्त्याला एक वेगळाच उत्साह असतो पण जो नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काळ्या आईची इमानेइतबारे सेवा करण्याची भूमिका घेत असताना आपण ही त्या शेतकऱ्यांना काही तरी मदत केली पाहिजे ही भावना मनात ठेवून हा उपक्रम घेतला आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,जिल्हा सचिव सुरज पेंडाल ,उपाध्यक्ष दादा थिटे, उपाध्यक्ष विजय मोरे,मल्हार आर्मीचे संतोष बंडगर, सुरज कांबळे, नवनाथ आसबे व शेतकरी उपस्थित होते.
खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळाच सामाजिक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केल्यामुळे अनेकांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपक्रमाचे कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button