Aurangabad

आलमगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा ग्रामस्थांनी केला सत्कार..

आलमगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा ग्रामस्थांनी केला सत्कार..

संजय कोल्हे

अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दक्षिणेश्वर नवनिर्माण ग्राम विकास पॅनेलने दणदणीत विजयी संपादन करत आपले स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. पंधरा वर्षे ग्रामपंचायतमध्ये सरपंच राहिलेल्या अशोक भिसे यांचा शिवाजीराव गोंटे यांनी प्रचंड मताने पराभव केला आहे. नऊ पैकी पाच जागेवर सदस्य निवडुन आणले आहे.
यामध्ये नवनिर्वाचित सदस्य शिवाजीराव गोंटे, यशोदाबाई बाबासाहेब शिंदे, चंद्रभागाबाई उत्तमराव भिसे, द्रौपदाबाई त्र्यंबकराव खरात व शांताबाई अंबादास वाघ या बिनविरोध निवडुन आल्या आहेत. या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी चेअरमन भगवानराव शेळके,बाळासाहेब गोंटे, शिवाजीराव शेळके,मदनराव खाडे,बाबासाहेब शिंदे,संदीप डोईफोडे, रघुनाथ भिसे,मधुकर आरगडे, कल्याण शेळके, लक्षीमन शेळके,अंकुश शेळके, बाबासाहेब भोसले,मंगेश बरकसे, बबन भोसले,भाऊसाहेब गोंटे, सुभाष खरात,वाल्मिक खरात,गोरख रंधे, संतोष शिंदेसह आदीची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button