Jalana

? CRIME DAIRY… बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावली कोलू घाणा संस्थेची जमीन

? CRIME DAIRY… बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावली कोलू घाणा संस्थेची जमीन
जालना : शहरातील कोलू घाणा सहकारी संघ लिमीटेड जालनाच्या नगरभूमापन जमीनचे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन परस्पर कब्जा केल्या प्रकरणी येथील तालुका जालना पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सखाराम बाबूराव मिसाळ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोलू घाणा सहकारी संघाची अधिकृत जमीन संघाचे तत्कालीन सभासद देविदास बालाजी मालोदे यांना संस्थेने किरायाने दिली होती.
मात्र, त्यांनी २५ वर्षांपासून भाडे दिले नाही. दरम्यान ऑक्टोबर २०२० मध्ये भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सदर जागेचे परस्पर पीआरकार्ड तयार करून जागेवर कब्जा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सखाराम मिसाळ यांच्या फिर्यादीवरू संशयित देविदास बालाजी मालोदे (मृत), कृष्णा देविदास मालोदे, श्रीराम कृष्णराव मालोदे, प्रल्हाद रामकिसन ससाने, अनिल निवृत्ती वाघमारे, संजय पंढरीनाथ मिसाळ व भूमिअभिलेख कार्यालयातील तत्कालीन दोन कर्मचाऱ्यांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button