Ausa

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तपसे चिंचोली येथील दिगंबर तेलंग यांनी दुकान ठेवले बंद

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तपसे चिंचोली येथील दिगंबर तेलंग यांनी दुकान ठेवले बंद

_औसा प्रतिनिधी_प्रशांत नेटके

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याचा प्रसार अधिकच वाढत चालला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, थेट संपर्क येत असल्याने या विषाणूचा फैलाव वाढू नये; यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहे. शासनासोबत आपणही उभे राहून कोरोना व्हायरस प्रादुर्भाव थांबविण्यासाठी,दक्षता म्हणून गावातील आपले दुकान बंद ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय तपसे चिंचोली येथील किराणा दुकानदार दिगंबर तेलंग यांनी घेतला आहे. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण असल्याने तेलंग यांच्या दुकानाला नेहमीच गर्दी पाहायला मिळते, पण तेलंग यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक दिनांक १५ पासून ३१ पर्यंत आपले दुकान बंद ठेवण्याचा विचार केला.

*थेट संपर्क असल्याने निर्णय*

किराणा ,झेरॉक्स, पंक्चर ,आणि पानपट्टी अशी दोन-तीन दुकान एकत्रित असल्याने , दररोज अनेक ग्राहक दुकानाच्या संपर्कात येतात. दररोज गावातील,बाहेरगावच्या नवीन ग्राहकांचा संपर्क येतो.अशातच पुणे,मुंबई लातुर, या ठिकाणाहून आलेल्या ग्राहकांचा संपर्क टाळावा ,बाहेर गावाहून आलेल्या ग्राहकां मुळे इतर ग्राहक व आपणाला विषाणूंची लागण होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार अधिक वाढू नये; यासाठी दक्षता म्हणून आपले दुकान बंद करण्याचा निर्णय तपसे चिंचोली येथील श्री स्वामी समर्थ किराणा दुकानदार दिगंबर तेलंग यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार त्यांनी पंक्चर,झेरॉक्स, पानटपरी,किराणा दुकान हे सर्व बंद करण्याचे दिगंबर तेलंग यांनी आपले दुकान १३ ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवून शासनाचा आणि जिल्हा प्रशासनाच्या कोरोना जनजागृती मोहिमेच्या लढाईत गावातील इतर किराणा दुकानदाराने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन तपसे चिंचोली येथील दुकानदार दिगंबर तेलंग यांच्याडून करण्यात आलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button