Pandharpur

शिवसैनिकांना पहाटेच अटक भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळे फासल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकावर रात्रीच गुन्हा दाखल केला आणि मध्यरात्री नोटीसा बजावत पहाटे अटकही केली पंढरपूर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पहाटेच अटक

शिवसैनिकांना पहाटेच अटक भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळे फासल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकावर रात्रीच गुन्हा दाखल केला आणि मध्यरात्री नोटीसा बजावत पहाटे अटकही केली पंढरपूर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पहाटेच अटक

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : भाजपचे माजी पंढरपूर शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळे फासल्या प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर रात्रीच गुन्हा दाखल करून पहाटे अटकही करण्यात आली आहे.
भाजपचे माजी पंढरपूर शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी एका आंदोलनादरम्यान शिवसेना कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरले होते त्यामुळे चिडून जाऊन शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी कटेकर यांना काळे फासून अंगावर साडी टाकत बांगड्यांचा हार घातला होता. या घटनेनंतर कटेकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.अवमानप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रवी मुळे यांनी कटेकर यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर शहर पोलिसांनी कटेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता परंतु त्यानंतर काल रात्री शिवसेनेच्या १७ पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांनी आपल्या अंगावर द्रव्य ओतले, डोळ्यात तेल गेल्यामुळे दिसणे बंद झाले आहे तसेच आपले सोने, अंगठ्या गायब झाल्या असून आपल्या जीवाला धोका असल्याचे कटेकर यांनी म्हटलेले आहे.
पंढरपूर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४९, ५००, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा काल रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी दाखल केला असून आज पहाटे पाच वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या नोटीसा मध्यरात्रीच शिवसैनिकांना बजावण्यात आल्या. त्याप्रमाणे शहरप्रमुख रवी मुळे यांच्यासह संदीप केंदळे, जयवंत माने, सुधीर अभंगराव आदी जवळपास १७ पदाधिकारी आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात पहाटे पाच वाजताच पोहोचले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर या पदाधिकारी, शिवसैनिकांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून आज दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे. वरवर सामान्य राजकीय वाद वाटणारे हे प्रकरण आता पेटणार याचे संकेत मिळताना दिसत आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यात या विषयावरून चांगलीच ठिणगी पडली असल्याचे दिसून येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button