रावेरात काँग्रेसचे शिरीष दादा चौधरी विजयी. ..तर अनिल चौधरी ठरले हरिभाऊ साठी जांईटकिलर …
विलास ताठे
रावेर विधान सभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार शिरीष दादा चौधरी भरघोस मतांनी विजयी झाले आहेत,
आधीच विधानसभा निवडणुकीत गफफार मलिक हे काँग्रेस साठी म्हणजेच शिरीष चौधरी यासाठी जाइंट किलर ठरले होते आणि हरिभाऊ जावळे विजयी झाले होते,
गेल्या दोन वर्षांपासून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, हे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात संपर्कात होते, यामुळे सुरूवातीच्या काळापासून रावेरात चुरस निर्माण झाली होती.
तसेच भाजप नेते मंडळी यांनाच अनिल चौधरी हे शिरीष चौधरी यांच्या बालेकिल्ल्यात मुक्कामी असल्याने ते काँग्रेसचे मते घेतली व अनिल चौधरी, हे भाजप साठी उपयुक्त ठरतील असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांनी समज करून घेतला होता, व ते थोडे अति आत्मविश्वासात होते, पण नेमके उलटेच झाले आणि अनिल चौधरी हेच भाजप साठी च जांईटकिलर ठरले.
रावेर विधान सभा मतदारसंघात विशेष बाब लोकशाहीत जागरूक मतदार व नवीन वाढलेले युवा मतदार यांनी पुरोगामी विचार सरणी व आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे शिरीष दादा चौधरी यांच्या पदरात भरभरून प्रतिसाद मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारी वाढून नोंद घेण्यासाठी व काँग्रेसच्या उमेदवाराला एक प्रकारचे मोठ्या प्रमाणात मतदारांनी पाठींबा दिला आहे, असे दिसून येते,
शिरीष चौधरी काँग्रेस यांना 77941 , तर भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांना 62332 आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 44841 मते मिळाली शिरीष चौधरी हे 15609 मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. .
लक्षणीय बाब म्हणून कोणत्याही परिस्थितीत रावेर विधान सभा मतदारसंघात जाती पाती चे राजकीय वर्तुळात गरम चर्चा झाल्या पण प्रत्यक्षात मतदारांनी मतदानावर कोणताही परिणाम झाला नाही, त्यामुळेच वंचित. एम आय एम यांना अत्यंत अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला हेच दिसून येत. याउलट अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे अल्पसंख्यांक असूनदेखील पंचेचाळीस हजार जवळपास मते मिळाली आहेत हे सत्य स्पष्ट पणे मान्य केले पाहिजे.
तसेच रावेरात विजयी उमेदवार शिरीष चौधरी यांच्या विजयी जल्लोषात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्ते सह उल्लेखनीय युवा कार्यकर्ते हे अति उत्साहात होते, यामुळे यांनी रावेरात मोठी भव्यदिव्य विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, यावल, दारा मोहम्मद .आसीफ मोहम्मद
प्रल्हाद बोंडे, डाॅ. राजेंद्र पाटील, गोंडू महाजन,
ज्ञानेश्वर महाजन, नीळकंठ चौधरी, विलास ताठे, योगेश पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, राजू सवर्ण, रवींद्र चौधरी, गंपा शेठ, किशोर बोरोले, चंद्रकांत भंगाळे, इरफान शेख,सह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. .






