श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघाच्या सुभाष बरडीया यांची निवड
चोपडा : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघाची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. गेली 22 वर्षे श्रीसंघाची धुरा सांभाळणारे संघपती सोहनराज टाटीया यांनी राजीनामा देवून उत्पन्न स्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते नव्या पदाधिकार्यांची निवड करण्याचे आव्हान पार पडले. अध्यक्ष पदावर संघाचे वरिष्ठ सदस्य सुभाषचंद किसनलाल बरडिया, उपाध्यक्ष पदी प्रदीप मिलापचंद बरडिया, सेक्रेटरी पदी संजय चंपालाल बरडिया, तर कोषाध्यक्ष पदी विनोद सोहनराज टाटीया व सह कोषाध्यक्ष पदी सह कोषाध्यक्ष महावीर उमेदमल टाटीया यांची निवड करण्यात आली.*_
_*नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सोहनराज टाटीया यांच्या हस्ते करण्यात येऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.*_
_*समाजातील सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करणयात आले*_






