Nashik

एक पणती दुर्गाला…” स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचा अनोखा उपक्रम

एक पणती दुर्गाला…” स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचा अनोखा उपक्रम

प्रतिनिधी : सुनिल घुमरे नाशिक


नाशिक : गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडुन तेजाकडे नेणार्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत पराक्रमी मावळ्यांच्या चरणी मुजरा करण्यासाठी “स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या” वतीने “एक पणती दुर्गाला” या उपक्रमा अंतर्गत येवला तालुक्यातील अंकाई- टंकाई या किल्लावर दि.१५ रोजीच्या सायंकाळी उपस्थित शिलेदारांच्या सोबतीने दिवाळी दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले
परीवाराच्यावतीने सण-उत्सव हे मराठ्यांच्या शौर्यशाली पराक्रमाची साक्षीदार असणार्या दुर्गावरती साजरा करण्यात येतात.या वर्षीचा दुर्ग दिपोत्सवाची सुरवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेत नाशिक प्रभागाचे श्याम गव्हाणे यांच्या हस्ते गडदेवतेचे पुजन करुन करण्यात आले.
यावेळी पेशवेकालीन सतीमाता मंदिर , लक्ष्मी-माता मंदिर व अंकाई लेणी परिसर, टंकाई येथील पुरातन महादेव मंदिर येथे दिवे प्रज्वलीत करण्यात आले.तर लेणी परिसरातील शिवराय मुर्तीपुजन बाळासाहेब झाल्टे यांच्या हस्ते पार पडले.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला आकाश कंदिल,फुलांची तोरण आणि पणत्याची आकर्षक आरास करण्यात आली. प्रवेशव्दाराजवळील शिवरायांचे विधीवत मुर्ती पुजन बाल शिलेदार साई आरगडे ,अनिकेत जाधव आणि बाल शिवव्याख्याते ओमकार थोरात यांच्या हस्ते पार पडले.भगव्या भंडार्याची उधळण,कुणाल तळेकरच्या शिवगर्जनेने आणि शिव घोषाने अंकाई-टंकाई परिसर निनादून निघाला होता.तेज आर्ट क्रियशनच्या संचालिका अर्चनाताई शिंदे,तेजस्विनी शिंदे आणि शुभम बेळे यांच्या रांगोळीने सर्वांना आकर्षित केले.
यावेळी शिवव्याख्याते प्रा.दिपकराजे देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि,हा दिपोत्सव सोहळा म्हणजे तिमिराकडुन तेजाकडे नेणारा,नवचैतन्य निर्माण करणारा आहे.दिवाळीच्या पर्वात आपण अभ्यंगस्नान करतो,अभंग्यस्नानमुळे बाह्यअंग साफ होते पण आपल अंतकरण ही शुद्ध होण गरजेच आहे.यासाठी आपण शिवरायांच्या चरणी एक पणती लावताना त्याग,संमर्पण आणि शुद्ध आचारणाची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे.आपल्या प्रत्येकाच्या हदयातील तो दिवा अजुन ही पेटला नाही जेव्हा तो शिवविचाराच्या शिवतेजाने पेटेल तेव्हा कुठे खर्या अर्थाने आपला दिपोत्सव साजरा होईल.
यावेळी दिपोत्सवासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर सदस्यांचे परिवाराचे संस्थापक कैलास दुघड यांनी आभार मानले व पुढील दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.दिपोत्सवास नाशिक प्रभागाचे सोमनाथ गव्हाणे, विजय महाले ,सुनिल बोराडे व त्यांचे सहकारी,मनमाड प्रभागातुन नाना भाऊ जाधव स्वनिल वाळुंज,किरण कापसे ,समाधान कदम तसेच येवला ,चांदवड प्रभागातील शिवबंधु उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button