Jalgaon Live: मजुरी करून परत आलेल्या आजीने घरात प्रवेश केला आणि दिसले नातीचे धक्कादायक दृश्य…
जळगाव शिरसोली येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली
आहे. आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात ही अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास होती. तिची आई तसेच आजी हे मजुरी काम करुन उदरनिर्वाह भागवतात. शनिवारी सकाळी अल्पवयीन मुलीची आई तसे आजी नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामासाठी निघून गेले. यादरम्यान, अल्पवयीन ही घरात एकटीच होती. घरी एकट्या असलेल्या मुलीने साडीच्या सहाय्याने छताला गळफास घेवून मृत्यूला कवटाळले.






