प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी कटिबद्ध!
रत्नाकर लाड (पंढरपूर बस स्थानक प्रमुख), ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने पंढरपूर आगारात प्रवासी दिन साजरा
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर (प्रतिनिधी) एस टी महामंडळ प्रवाश्यांकारिता विविध सवलतीच्या योजना राबविते. त्यांना दर्जेदार सेवा पुरविणे एसटी चे आद्य कर्तव्य असून प्रवाश्यांच्या सेवेसाठी एस टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंढरपूरचे बस स्थानक प्रमुख रत्नाकर लाड यांनी येथील महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या पंढरपूर शाखेच्या वतीने आयोजित प्रवासी दिनाच्या कार्यक्रमात केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे. पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे, दैनिक सकाळचे भारत नागणे यांच्यासह जिल्हा सचिव सुनील यारगट्टीकर, ग्राहक पंचायतीचे पंढरपूर शहर अध्यक्ष दिनेश खंडेलवाल, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पंढरपूर शहर अध्यक्ष पांडुरंग बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज्य परिवहन महामंडळात ३०,२५,२० आणि १५ वर्षे विना अपघात सेवा पुरविणाऱ्या चालकांचा तसेच जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाहकांचा शिवाय कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच एसटी मधील व फलाटावरील प्रवाश्यांना तीळगुळ वाटण्यात आले. दरम्यान शहरअध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाच्या कार्याविषयी बोलताना सांगितले की रथसप्तमी हा भारताचा राष्ट्रीय प्रवासी दिन आहे.

याच दिवशी ग्राहक पंचायतीचे प्रणेते स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांनी १९८१ साली प्रवासी महासंघाची स्थापना केली ग्राहकाला नेहमीच केंद्रबिंदू मानून प्रवासी हासुद्धा रेल्वे व एसटी चा प्रमुख ग्राहक असतो त्याला प्रवास सवलत व हक्क मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांनी न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले होते व आजही ही संघटना प्रयत्न करत आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे यांनी प्रवासी दिनाबद्दल व ग्राहक पंचायतीच्या चळवळीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व प्रवाशांनी आपल्या अडचणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे व प्रवासी महासंघाकडे मांडाव्यात अशा सूचनाही केल्या यावेळी पत्रकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे सह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सौ. अर्चना कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव सुनील यारगट्टीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीनिवास खाबाणी, विजय वरपे, मिलिंद वाईकर, सागर रणदिवे, विजय सामंत,शिवकुमार भावलेकर,दत्तात्रय ताठेे, सुधाकर खरात,वर्षा गायकवाड,चिंतामणी दामोदरे सर आदींचे परिश्रम लाभले. कार्यक्रमासाठी विजय कांबळे, सुदर्शन खंदारे,महेश देठे,महादेव खंडागळे,पत्रकार बजरंग नागने, एस टी. महामंडळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह फलाटावरील असंख्य प्रवासी उपस्थित होते.






