Pandharpur

वाळू माफिया वर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई…

वाळू माफिया वर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई…

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर शहर व तालुक्यात वाळूचोरीचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील नळी या गावात भीमा नदीच्या पात्रातुन टेम्पोने बेकायदेशीर वाळू उपसा करीत असताना छापा टाकून अंदाजे १लाख पंचविसशे रुपये किमतीची वाळू व टाटा ४०७ टेम्पो तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना रविवार दि ४ऑक्टोबर रोजी सकाळी ६च्या दरम्यान घडली.प्रकाश औंदुबर पांढरे,(रा.नळी, ता.पंढरपूर) हे रविवार दि ४ ऑक्टोबर रोजी आपल्या निळ्या रंगाच्या टाटा ४०७ क्रमांक एम एच १३बी ३५७३या वाहनातून अहिल्या चौक,नळी येथून वाळू घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले, व वाहनाची तपासणी करण्यात आली, यावेळी बेकायदेशीर पणे वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. पो हे कॉ क्षीरसागर, बने,मोरे यांच्या पथकाने पो नि किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली व गौण खनिज कायद्याअंतर्गत कलम ३७९,१९७८,४(क) २१प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिक तपास तालुका पोलीसठाणे अंमलदार करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button