गरीबांचे धान्य हडप करणाऱ्या रास्तभाव दुकानदारावर महसुल विभागाची कारवाई
जनतेच्या तक्रारीची महसुल विभागाची गंभीर दखल .
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
गोरगरीब जनतेच्या रेशन कार्डवरील अपुरे धान्य वाटप करून स्वताचा खिसा भरणाऱ्या कांदलगाव येथिल रास्तभाव दुकानदार अंधारे यांच्या विरूद्ध तक्रार आल्याने तलाठी विशाल खळदकर यांनी दि, १९ रोजी पंचनामा करून अहवाल सादर केल्याने पुरवठा विभागाने दुकानाचा परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालया कडे सादर केला आहे .
या बाबत आधिक माहिती अशी की दुकानदार अंधारे हा रेशन कार्ड धारकांना अरेरावी करीत असुन कार्ड प्रमाणे धान्य वाटप करीत नाही तसेच पावती देत नसल्याची तक्रारी तहसिल कार्यालतील पुरवठा विभागात काही प्राप्त झाल्याने तक्रारीची दखल घेत तलाठी विशाल खळदकर यांना चौकशीचे आदेश दिले होते .
दि १९ रोजी सकाळी तलाठी विशाल खळदकर यांनी कांदलगाव येथे दुकानास भेट देऊन तपासणी केली असता अनेक कार्ड धारकांना ५ ते २ किलो कमी धान्य वाटप केल्याचे आढळून आल्याने तलाठी यांना पंचा समक्ष पंचनामा करून अहवाल तहसील कार्यलयात सादर केला .
या अहवालाच्या अधारे दुकानदार अंधारे यांचा रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर करण्यात आला आहे .






