Yawal

यावल कृषि उत्पन बाजार समितीचे सहाय्यक सचिव सेवानिवृत्त

यावल कृषि उत्पन बाजार समितीचे सहाय्यक सचिव सेवानिवृत्त

शब्बीर खान यावल

यावल : यावल कृउबास चे सहाय्यक सचिव विजय रामकृष्ण कायस्थ हे दि.31 मे 2021 रोजी आपल्या 36 वर्षे च्या प्रदिर्घ सेवे नंतर सहाय्यक सचिव या पदावरून सेवानिवृत्त झालेत. शिपाई या पदावरून त्यांनी आपली प्रदिर्घ सेवेला प्रारंभ केला होता. या आपल्या अखंड 36 वर्षाच्या बाजार समिती च्या सेवेत शिपाई ; लिपिक ; लेखापाल ; निरिक्षक ; ते सहाय्यक सचिव आदि पदे त्यांनी निर्भिड पणे सांभाळून बाजार समिती ची सेवा केली. काही वर्ष त्यांनी प्रभारी सचिव पद ही सांभाळून बाजार समितीत एक मानाचे पद व स्थान निर्माण केले होते. त्यांच्या या सेवानिवृत्त बद्दल त्यांचा यावल कृषी उत्पन्न बाजार समिती चे वतीने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व बाजार समिती चेअरमन तुषारभाऊ पाटील ; उपसभापती उमेश पाटील ; संचालक नारायणबापु चौधरी ; अशोक चौधरी ; राकेश फेगडे ; सुनिल बारी ; सत्तार तडवी ; व सचिव एस. बी.सोनवणे आदि मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी बाजार समिती चे लेखापाल वाय.एम चौधरी ; निरिक्षक के.जे. सोनवणे ; लिपिक एन.पी.बारी ; व्ही ए भालेराव ; के. एन. तडवी ; डि.यु महाजन ; डी.जी.चौधरी ; व विनित कोलते ; विनोद सोनवणे ; शकील तडवी ; रेखा भामरे ; चंदन बारी ; व इतर कर्मचारी सोशल डिस्टिंगचे अंतर ठेवुन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button