Pandharpur

महाराष्ट्र राज्य सेवा संघटनेकडून पंढरपूर तहसील कार्यालय येथे निवेदन

महाराष्ट्र राज्य सेवा संघटनेकडून पंढरपूर तहसील कार्यालय येथे निवेदन

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील मौजे भाळवणीयेथील सून 2008अगोदर ज्या लोकांची असिसमेंट उताऱ्यावर भोगवटदार म्हणून नोंद आहेत त्या लोकांचे जागेचे उतारे नेयमीत करण्याचे आदेश केलेले आहेत मौजे भाळवणी ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गेले 25 वर्ष राहत असलेल्या कुटुंबाच्या नोंदी भोगवटादार म्हणून धरण्यात आलेली नाहीत त्याच गावठाण मध्ये त्यांचे लोकांना नळकनेक्शन सिमेंट कॉंक्रिटीकरण चे रस्ते व वीज कनेक्शन तसेच समाज मंदिर अंगणवाड्या असतानासुद्धा या लोकांना भोगवटदार का करण्यात आले नाही तरी हे सर्व त्यांच्यामध्ये राहणारे दलित व मागासवर्गीय समाजाचे घटक असून त्यांना रमाई घरकुल मंजूर झाल्यास जागेअभावी घरकुल मंजूर होत नाही म्हणून येथे राहणारे सर्व मागासवर्गीय दलित बेघर असुन त्यांना त्यांची राहत्या ठिकाणी नियमीत करण्याचे आदेश करण्यात यावेत व प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना देऊन बेघरांची प्रश्न मिटवावे अशी मागणी महाराष्ट्रराज्य जनसेवा संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महिला आघाडी अविंदाताई गायकवाड यांनी निवेदन द्वारे दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button