Pandharpur

शिवभोजन योजनेसाठी महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य द्यावे राष्ट्रवादीच्या साधना राऊत यांचे निवेदन

शिवभोजन योजनेसाठी महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य द्यावे
राष्ट्रवादीच्या साधना राऊत यांचे निवेदन

पंढरपूर
प्रतिनिधी रफिक आत्तार

राज्यात सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शिवभोजन योजनेसाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
यासंबंधीचे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांचेकडे नुकतेच दिले. यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. है
संपूर्ण राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शिवभोजन योजना राबवली जाणार आहे. यासाठी हॉटेलचालक, खानावळ चालक तसेच बचत गटांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेसह अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
हॉटेल्स चालक आणि खानावळ चालक यांना या योजनेची मंजुरी देण्याऐवजी गरजू बचत गटातील महिलांना या योजनेत सहभागी करून घेतल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. असे सांगून या योजनेमध्ये प्राधान्याने महिला बचत गटांना सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या साधना राऊत यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button