Jalgaon

जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार २०२० जाहिर

जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार २०२० जाहिर

रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधीजळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन तर्फे अॅथलेटिक्स असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या खेळाडूंसाठी दरवर्षी देण्यात येणारे ”जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार २०२०” जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी आज जाहिर केले. यात जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनला संलग्न असणारे व गतवर्षी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शालेय गटातून, महाविद्यालयीन गटातून , खुला गटातून व अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार देण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातून संलग्न खेळाडूंकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते आलेल्या प्रस्तावाची छाननी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील, सहसचिव किशोर पाटील, सदस्या डॉ.कांचन विसपुते, व सदस्य गिरीश पाटील यांच्या जिल्हा पुरस्कार निवड समितीने केली.स्व. जितेंद्र शरद ठाकरे स्मृती जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू शालेय गट पुरस्कार ललित लक्ष्मण गावंडे (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर). स्व. महेश मधुकर वेरुळकर स्मृती महाविद्यालयीन गट जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार आसिफ हमीद तडवी (व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर). खुल्या गटातील जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार किशोर विश्वनाथ सुर्यवंशी (जळगाव) तर जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रमोद गंगाराम भालेराव (क्रीडाशिक्षक,शरदचंद्रिका पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्जाणे चोपडा) यांना जाहीर करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम परवानगी सुरू झाल्यानंतर वितरित केले जातील.राजेश जाधव-सचिव, जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button