जळगाव जिल्हाधिकारी बदलीचे आदेश मिळाले नाहीत – डॉ. अविनाश ढाकणे
रजनीकांत पाटील
अद्यापपर्यंत बदलीचे आदेश मिळालेले नाहीत. सामन्यांच्या हितासाठी आपण काम सुरूच ठेवणार आहोत. – डॉ. अविनाश ढाकणे जिल्हाधिकारी
जळगाव >> कोरोना रुग्णांचा मृत्युदर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे जळगाव देशभर चर्चेचा विषय ठरला असल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाल्याची शनिवारी पुन्हा चर्चा रंगली. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे सीईसो अभिजित राऊत हे येणार असल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाले. राऊत यांच्या छायाचित्रासह अभिनंदनाचे संदेशही दिसले. मात्र जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी इन्कार केला असून आपल्यापर्यंत असे आदेश आले नसल्याचे सांगितले आहे.






