महाराणा प्रताप पुण्यतिथीनिमित्त गरीब
कुटुंबियांना युवा मित्र मंडळी कडून अन्न दानाचे पुण्य काम.
जळगाव : महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथनिमित्त व संपूर्ण देशात चालू असलेल्या मंदीमुळे गोरगरिबांची उपासमार होत आहे. त्यांची मेहनत करायची तयारी असून सुद्धा त्यांच्यासाठी पुरेपूर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आहे तर त्याचवेळी राजपूत बांधव तोषालसिंग सतिष पाटील (अंतूर्लीकर), अमितसिंग कल्याणसिंह पाटील, रोहित गोपालसिंग पाटील आणि इतर बांधवांचा वतीने शहर परिसरातील प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बस स्टँड, अजिंठा चौफुली, सिंधी कॉलनी आणि महामार्ग ६ जवळच्या भागात राहणाऱ्या 200 हून अधिक गरीब गरजू कुटुंबांना अन्न वाटप करण्यात आले.






