Mumbai

अँट्रोसिटी दाखल असलेल्या अरोपी सौ.वैशाली देशपांडे यांना अटक करा – बिकेडीच्या सुनिता गेंगजे यांची सायन पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे पोलीसाकडे मागणी

अँट्रोसिटी दाखल असलेल्या अरोपी सौ.वैशाली देशपांडे यांना अटक करा – बिकेडीच्या सुनिता गेंगजे यांची सायन पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे पोलीसाकडे मागणी

पी व्ही आनंद मुंबई

मुंबई : सौ.सरला ठाकुर ह्या आदिवासी महिलेवर हल्ला करणा-या ,अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल झालेल्या सौ.वैशाली देशपांडे यांना तात्काळ अटक अटक करा व शारीरिक व मानसिक छळ करणारे संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करा ,अशी मागणी मुंबई शहर व उपनगर बिरसा क्रांती दलाचे महिला फोरम शहरध्यक्षा सुनिता गेंगजे, आदिवासी शक्ती सेना महा.राज्य दिंडोरी तालुका उपसरचिटणीस आदि. सतिश भाऊ उंबरसाडे, व रावण साम्राज्य या संघटनेचे आदि. मोहन भाऊ खाडे यांनी मुंबई येथील सायन पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
तक्रारी नुसार सौ.सरला संजय ठाकुर ह्या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. शिक्षण साधना मंडळाचे “साधना विद्यालय सायन” येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. सौ.सरला ठाकुर ह्या आदिवासी समाजाच्या असल्यामुळे शिक्षण साधना मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत खोपडे हे विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांना हाताशी धरून सौ.सरला ठाकुर यांना कटकारस्थाने ,षडयंत्र रचून खोट्या तक्रारी करणे,विनाकारण आरटीआय अर्ज टाकणे, असहकार सामूहिक सुट्ट्या घेणे, मोबाईल फेकणे, प्रशासकीय पञाचे तुकडे करुन तोंडावर फेकणे, जातीवाचक अश्लील शिविगाळ करणे, भरसभेत अश्लील भाषेत बोलून अपमानित करणे, हल्ला करून जखमी करणे, पदोन्नतीत डावलणे, सेवानिवृत्तासाठी जबरदस्ती करणे. इत्यादी प्रकारे नाहक प्रचंड शारीरीक व मानसिक छळ करीत आहेत. साधना विद्यालयातील सौ.वैशाली देशपांडे शिक्षिका/ सुपरवायझर यांनी सौ.सरला ठाकुर यांच्यावर हल्ला चढवत बोटे पिरगळून नखाने हाताला बोचकले आहे व छातीवर दाब दिला आहे.त्यानंतर 100 नंबरवर संपर्क करून सौ.सरला ठाकुर यांनी पोलिसांना आपल्यावरील हल्ल्याची माहिती दिली आहे तेव्हा सौ. सरला ठाकुर यांच्या तक्रारीकडे पोलीसांनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. व वैद्यकीय उपचारही करवून घेण्यासही टाळाटाळ केल्याचे दिसते. त्या हल्ल्यात सौ. सरला ठाकुर यांना गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्यामुळे त्यांनी नाईलाजाने सायन हास्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार घेतले आहेत. व वैद्यकीय रिपोर्ट सादर केलेला आहे.
तब्बल 14 महिन्यानंतर सौ.वैशाली देशपांडे यांच्या वर (अॅस्ट्रासिटी) अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाशय, अॅस्ट्रासिटीचा फौजदारी गुन्हा हा दखलपात्र असताना आरोपी सौ.वैशाली देशपांडे यांना तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. साडे तीन लोटूनही चौकशीचे कारण सांगत आरोपीस अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे. तेव्हा अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सौ.वैशाली देशपांडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी व शिक्षण साधना मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत खोपडे यांच्या सह दोषारोपीत व्यक्तींवर तात्काळ पोलीस कारवाई करण्यात यावी. हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा क्रांती दल संघटना आपल्या पोलीस प्रशासना विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. अशी मागणी करत आंदोलनाचा इशाराही बिरसा क्रांती दलाच्या वतीने प्रशासनास दिला आहे.

अँट्रोसिटी दाखल असलेल्या अरोपी सौ.वैशाली देशपांडे यांना अटक करा - बिकेडीच्या सुनिता गेंगजे यांची सायन पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे पोलीसाकडे मागणी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button