Maharashtra

स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाकडून मध्यप्रदेशातील अट्टल दुचकीचोरास अटक

स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाकडून मध्यप्रदेशातील अट्टल दुचकीचोरास अटक

स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाकडून मध्यप्रदेशातील अट्टल दुचकीचोरास अटक

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोन अमळनेर पोलीस स्टेशनला एक असे दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील महाधु ब्राम्हणे वय ३१रा. केरमला ता.वरला जिल्हा बडवानी यास अटक केलीआहे त्याने त्याचा घरामाघे लपविलेल्या तीन दुचाकी त्याचाकडून हस्तगत करण्यात आहे 
पोलीस अधीक्षक डॉ . श्री . पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती . भाग्यश्री नवटके , अपर पोलीस अधीक्षक श्री . सचिन गोरे  यांनी जळगाव जिल्यात मोटर सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते .
                   त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम  यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ .नारायण पाटील , रामचंद्र बोरसे , मनोज दुसाने , प्रवीण  हीवराळे यांना तात्काळ रवाना केले होते. 
                 वरील पथकाने मोटर सायकल चोरी झालेल्या घटना स्थळाचा अभ्यास करून गोपनीय माहिती काढली कीं , मध्यप्रदेश  राज्यातील सुनिल महादु ब्राम्हणे वय ३१ रा.केरमला ता.वरला जि.बडवणी हा चोपडा , अमळनेर , धरणगाव परिसरात येऊन मोटर सायकली चोरत आहे . 
                 त्या अनुषंगाने पोहेकॉ .नारायण पाटील , रामचंद्र बोरसे , मनोज दुसाने , प्रवीण  हीवराळे यांनी  मध्यप्रदेश राज्यात जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो .केरमला ता.वरला जि.बडवणी येथे मिळून आला असता त्याची अधिक चौकशी केली. त्याने चोपडा शहरातून चोरलेल्या ०२ मोटार सायकली व अमळनेर शहरातून चोरलेली ०१ मोटर सायकल अशा एकूण ०३ मोटर सायकली त्याचे घराचे मागील बाजूस लपवून ठेवलेल्या दिल्याने सदर पथकाने त्या जप्त करून आरोपी -सुनिल महादु ब्राम्हणे वय ३१ रा.केरमला ता.वरला जि.बडवणी यास ताब्यात घेतले . ०३ मोटर सायकली  (१) चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . १४३/२०१८ भा द वि . ३७९ (२) चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . २८५/२०१८ भा द वि . ३७९ (३) अमळनेर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . ८७/२०१९ भा द वि . ३७९ या गुन्ह्यातील निष्पन्न झाल्याने आरोपी -सुनिल महादु ब्राम्हणे यास चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . २८५/२०१८ भा द वि . ३७९  या गुन्ह्यात तपास कामी चोपडा शहर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात दिले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button