Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील कोतवाल ची हकालपट्टी करा रानबा शिंदे यांची मागणी कोतवालाची भरली झोळी ..

पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील कोतवाल ची हकालपट्टी करा रानबा शिंदे यांची मागणी कोतवालाची भरली झोळी ..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शासकीय अनुदानाची खिरापत वाटण्याचं काम सरकारी बाबूंकडं असतं. या खिरापतीच्या वाटपासाठी निकष असतात.कोणाला किती द्यायचं हे शासनाने ठरविलेलं असतं. वाढप्या ओळखीचा आला की ताटात कमी पडत नाही , सरकारी बाबू ओळखीचा असला की नियमात सूट मिळते.याही पुढे जाऊन काही सरकारी बाबू वागतात आणि मग सुरू होतो धिंगाणा. असाच धिंगाणा कान्हापुरी गावात सुरू झालाय. नियम मोडीत काढून आपल्या सहकार्‍याच्या झोळीत बोगस शासकीय अनुदान टाकण्याचा प्रकार येथील अधिकाऱ्यांनी केलाय गावचा कोतवाल कुंडलिक विठ्ठल शिंदे यास बोगस अनुदान देण्याचे धाडस तेथील अधिकाऱ्यांनी दाखविलेय. अधिकाराचा गैरवापर करून शासनाची मोठी फसवणूक केलीय. याप्रकरणी ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीने महसूल विभागात चांगलीच खळबळ उडालीय.कान्हापुरी येथील ग्रामस्थांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे धाव घेतली आहे .शुक्रवारी याबबतची तक्रार संबंधितांकडे दिली आहे. ग्रामस्थांचे पंचनामे कोतवालाच्या घरी बसून करणाऱ्या ग्रामसेवक ,कृषिसहाय्यक आणि कोतवालास निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या सरकारी बाबूंबाबत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी काय निर्णय घेणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.पंढरपूर तालुक्यात 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली होती नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते याबाबतचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या याचवेळी कान्हापुरी येथे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्यात आले येथील ग्रामसेवक जाधव कृषी सहाय्यक यांनी हे पंचनामे करावयाचे होते परंतु हे पंचनामे येथील कोतवाल कुंडलिक शिंदे यांच्या घरी बसून करण्यात आले हे बोगस पंचनामे केल्याने अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले याच वेळी कोतवाल कुंडलिक विठ्ठल शिंदे यांच्या कुटुंबियांच्या नावे मात्र कमी क्षेत्र असतानाही मोठे क्षेत्र दाखवून पंचनामे करण्यात आले आणि शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली कोतवाल कुंडलिक शिंदे यांच्या कुटुंबातील रेश्मा कुंडलिक शिंदे विठ्ठल कुंडलिक शिंदे यांच्या नावे जास्तीचे क्षेत्र दाखवून अनुदान हडपण्याचा आले प्रत्येकाच्या नावे दोन हेक्टर उसाचे नुकसान दाखवण्यात आले वास्तविक पाहता या व्यक्तींच्या नावे तेवढी जमीन नसताना ग्रामसेवक जाधव यांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झाले. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश असताना बोगस पंचनामे करण्यात आले यामध्ये अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले याबाबत कान्हापुरी ग्रामस्थांनी येथील उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे याबाबत तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडे असते. कृषी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कान्हापुरी येथील ग्रामसेवक जाधव यांच्याकडे हे काम देण्यात आले होते जाधव यांनी कोतवालाच्या घरी बसून बोगस पंचनामे केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. कोतवाल कुंडलिक शिंदे यांच्या कुटुंबियांच्या नावे बोगस पंचनामे करून शासकीय अनुदान हडपण्याचा प्रकार घडला आहे
कान्हापुरी येथे बोगस पंचनामे करून कोतवालाच्या कुटुंबियांच्या नावे बोगस अनुदान लाटण्यात आले आहे कान्हापुरी ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार धिकार्‍यांकडे दिली आहे याप्रकरणाची चौकशी मंडळ अधिकाऱ्यांकडून होण्याचे सूतोवाच निवासी नायब तहसीलदार यांनी दिले आहे. करकंब विभागाचे मंडळ अधिकारी याप्रकरणी चौकशी करून काय अहवाल देतात याकडे कान्हापुरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button