राजेंद पाटील यड्रावकर यांची राज्यमंत्रीपद वर्णी मोबाईल टॉवर सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने पंढरीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला
प्रतिनिधी (रफिक आत्तार)
पंढरपूर- महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची राज्यव्यापी संघटना असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने ना.यड्रावकर यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याचा आनंद पेढे वाटून व्यक्त केला आहे.गेल्या ९ वर्षांपासून राज्यातील मोबाईल टॉवरसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नासाठी ना.यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत आहे.
या बाबत अधिक माहिती देताना संगटनेचे जिल्हाअध्यक्ष मारुती वाघमोडे म्हणाले कि,सोलापुर जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार मोबाईल टॉवर आहेत.विशेतः ग्रामीण भागात कंपनीकडून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येतात. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांची संख्या मोठी आहे.या संघटनेच्या माध्यमातून विविध समस्या सोडिवण्यासाटी ना.यड्रावकर पाटील यांनी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुनीर शेख यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. त्या मुळे या जिल्ह्यातील अनेक सुरक्षा रक्षकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे.तर आणखी काही प्रश्न प्रलंबित आहेत. आता आमचे मार्गदर्शक ना. यड्रावकर पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे हे प्रलंबित प्रश्नही सुटतील असा आम्हाला विश्वास असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव,चेतन जाधव,गणेश काळे, मारुती शिंदे, भागवत गुरव,दीपक पवार, अनिल चवरे, सूर्यकांत धांडोरे, हरी मार्कड, विशवनाथ शिंदे, आर. के. झांम्बरे, अनिल बाबर, दीपक ढाळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






