Khirdi

अशी ही एक जुनी “आठवण” तब्बल २१ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटले…!!!

अशी ही एक जुनी “आठवण” तब्बल २१ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटले…!!!

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : खिर्डी येथून जवळच मस्कावद ता.रावेर येथील वामनराव कृष्णाजी पाटील विद्यालयाची सन १९क९५ ते २००० ही बॅच आज दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी तब्बल २१ वर्षानंतर पुन्हा भेटली.
जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंधन अतूट राखण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हे स्नेह संम्मेलन आयोजित करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, मनोरंजनासाठी विविध गेम्स, प्रश्नमंजुषा पण ठेवण्यात आली. प्रत्येक मित्र मैत्रिणींनी एकमेकांना काही भेट वस्तू देऊन कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई,पुणे,नाशिक येथे स्थलांतरित असलेले मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२१ वर्षानंतर भेट झाल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मैत्री जपण्यासाठी झालेल्या या अनोख्या कार्यक्रमावर संपूर्ण मस्कावद ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता.

दरम्यान च्या काळात काही मित्र व शिक्षक यांचे निधन झाले त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली.
या अनोख्या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी किरण तायडे, डॉ.युवराज चोपडे, नितीन वानखेडे, जयंत पाटील, मिलिंद भारंबे, सुधीर सपकाळे, गणेश सपकाळे, जागृती पाटील, लीना पाटील, रंजना पाटील आदींनी आपले योगदान दिले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना पाटील ने तर प्रस्तावना किरण तायडे यांनी केले.
स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

Back to top button