Nashik

जिल्हा दिशा समितीच्या कृषी विभागाच्या बैठकीत खा डॉ भारती पवारांनी केल्या विविध सूचना

जिल्हा दिशा समितीच्या कृषी विभागाच्या बैठकीत खा डॉ भारती पवारांनी केल्या विविध सूचना

सुनिल घुमरे नाशिक

Nashik : दिशा कमिटीचे अध्यक्ष खा.हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा कृषी अधिकारी पडवळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य प्रकल्प अधिकारी उज्वला भावके यांचेसह नासिक जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, सहाययक कृषि अधिकारी आदी अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिशा कमिटीच्या कृषी विभागाच्या बैठकीत जिल्हाभरात केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, परंगपरागत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना, मृदा स्वास्थ कार्ड योजना अशा विविध योजनांचा आढावा या प्रसंगी खा डॉ भारती पवार यांनी घेतला यात प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रात जिल्ह्यात व दिंडोरी लोकसभा मतदार संघात किती प्रकल्प पूर्ण झाले किती प्रलंबित आहेत व किती प्रस्तावित आहेत याची सविस्तर माहिती घेत त्यात अनेक सुधारित सूचना केल्या यात भूमिहीन अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांसाठी तसेच सूक्ष्म उद्योजकता व शेती उत्पादनात वाढीसाठी उत्पादन पद्धती ह्या घटकांची तरतूद आहे जलसंधारणाची कामे त्यात डोंगर माथा ते पायथा सूक्ष्म नियोजनाद्वारे सलग समतल चर ,माती नाला बांध, सिमेंट नाला बांध,शेततळे, वन तळे ,जुने भात खाचरे दुरुस्ती, वृक्ष लागवड आदींमध्ये कामे केली गेली पाहिजेत या दृष्टीनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच उपजीविका उपक्रमाअंतर्गत शेळीपालन, गोपालन,,कुकुट पालन, किराणा दुकान, भाजीपाला विक्री, मसाला कांडप, सलून व्यवसाय ,कृषी औजारे इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशा महत्वाच्या सूचना खा डॉ भारती पवारांनी बैठकीत केल्या. बचतगट, वयक्तिक भूमिहीन लाभार्थी यांना फिरता निधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा जास्तीत जास्त अल्प भूधारक शेतकऱ्यांनाही अनुदान उपलब्ध करून घ्या अशी मागणीही केली .शेतकरी पीक विमा काढतात पण त्यांना वेळेवर क्लेम करून सुद्धा नुकसान भरपाई मिळत नाही त्याकडेही लक्ष वेधले .ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घ्यावा, बिगर हंगामी पिकांसाठी उच्च तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी चे प्रशिक्षण शिबीर ग्रामीण भागात आयोजित करावे, दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी तसेच फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे तसेच कांदा पीक साठवणुकीत होणारे नुकसान कसे कमी करता येईल यासाठीही काम करणे गरजेचे आहे यासाठीही प्रयत्न झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, त्यांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्द करून देणे त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करून गरजू लाभार्थ्यांची निवड केली गेली पाहिजे .,सेंद्रिय शेतीला ही तेवढेच महत्व दिले गेले पाहिजे, त्यासाठी सेंद्रिय शेतमालाची विक्री व्यवस्था उभी केली पाहिजे जेणेकरून कीटकनाशक मुक्त शेतमाल ग्राहकास उपलब्द्ध करून देऊ शकतो .यासाठी सेंद्रिय कृषी प्रदर्शने, मेळावे ,शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री व्यवस्था , जास्तीत जास्त ठिकाणी निर्माण करून द्यावी, तसेच वाहतुकीसाठी वाहन खरेदीस ही साहाय्य करावे सेंद्रिय उत्पादित मालाचा ऑरगॅनिक ब्रँड तयार करावा व त्याची शासकीय स्तरावर अमलबजावणी करावी अशा अनेक प्रकारच्या सूचना खा डॉ भारती पवार यांनी या बैठकीत केल्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button