Jagaon Live: जिल्ह्यात ह्या कारणासाठी २३ एप्रिल पर्यंत कलम ३७(१)(२) जारी..
जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.
दि. 9 ते 23 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी करावी असे अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या कालावधीत ईस्टर संडे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे सण आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमळनेर सह इतर तालुक्यात धार्मिक तेढ निर्माण झाली होती. सध्या परिस्थिती निंयत्रणात आहे. पण सावधगिरी म्हणून जिल्ह्यात कलम ३७ लागू करण्यात आले आहे.






