प्रांताधिकारी सचिन ढोले आणि न.पा.मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत
रफिक आतार
पंढरपूरकरांनो आज पंढरपूर शहरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोन्ही व्यक्ती महानगरातून पंढरपुरात आलेल्या होत्या आणि त्यांचा होम कोरेंटाईनचा आग्रह होता मात्र त्यास दाद न देता प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी संस्थात्मक कोरेंटाईनचा आग्रह धरत संबंधित ठिकाणी पाठवले.
यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्णास सुरुवातीस कुठलेही लक्षणे आढळून येत नव्हती.पुढे त्यास सर्दीचा त्रास होऊ लागला इतकेच.पण रिस्क नको म्हणून चाचणी घेण्यात आली आणि सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.विशेष म्हणजे याचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी दोनच दिवसात संपुष्ठात येणार होता आणि त्या नंतर शहरातील एका दाट लोकवस्तीच्या परिसरातील झोपडपट्टीतील आपल्या घरी ते कुटुंब जाणार होते.
वेळीच प्रशासनाने दखल घेतली नसती तर पुढे पंढरपूरकरांवर भीषण संकट ओढवले असते.त्यामुळेच आपण पंढपूरकरकरानी प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत






