सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक वसावे साहेब यांनी नवरात्र आणि इद मिलाद शांतता कमेटी बैठक संपन्न
विजय कानडे
नवरात्र उत्सव आणि इद-मिलाद या महिन्यात येणार म्हणून सुरगाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक वसावे साहेब यांनी सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यकर्ते यांना मीटिंग मध्ये मार्गदर्शन केले सामूहिक नमाज पठण करू नये कारण कोराना या आजारा मुळे दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच नवरात्र उत्सव साजरा करताना देवी मंडळांनी गरबा दांड्या हा कार्यक्रम न ठेवता रक्तदान शिबीर आयोजित करा तसेच सामाजिक उपक्रम राबवा बळजबरी वर्गणी गोळा करू नये विदूतमहामंडल, नगरपंचायत, सर्व विभागांना कळून विदुयत पुरवठा खंडीत होणार नाही यांची काळजी घेण्यास साठी पोलीस स्टेशन कडून पत्र व्यवहार केले जाईल तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगितले तसेच ऑनलाईन दर्शन भाविकांना होइल याची सोयी करा मीटिंगसाठी सुरेश गवळी,सचिन आहेर,एकनाथ भोये,गणेश पवार,अबू शेख,ज्ञानेश्वर कराटे, धर्मेंद्र पगरिया तसेच पोलीस साह्य निरीक्षक बोडके सर,पोलीस सब इन्स्पेक्टर नाद्रे सर ,जोपळे दादा आदी उपस्थित होते






