लोकप्रतिनिधी केलेल्या पाठपुराव्यांना यश ! परंडा तालुक्यातील गारपीठचे वेगात पंचनाम्यास सुरूवात
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थीक मदत करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याकडे केली होती या मागणी नुसार पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे कर ण्यात येत आहेत.
वादळी वारा व गारपीटीमुळे परंडा तालूक्यातील मोसंबी,आंबा, खरबुज, कलिंगड, डाळिंब,द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले ,तर गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अवेळी येणाऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मागील हंगामात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे.
परंडा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे अंदोरी येथील गरीब शेतकरी रामा अर्जुन बारस्कर यांच्या दोन एकर खरबुजाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परंडा तालुक्याचे तहसीलदार डॉ.तुषार बोरकर यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठय़ांना दिले.त्या आदेशाचे पालन करत तालुक्यातील अंदोरी येथे कृषी सहाय्यक अशोक पाटील ,तलाठी स्वामी,ग्रामसेवक बारकुल गावातील पोलीस पाटील अंगद बारस्कर,समक्ष पंचनामे केले आहेत.






