Maharashtra

255 कुटुंबाना वाटला “एक टन” भाजीपाला मोफत… इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द मधील शेतकऱ्यांनी पाळला शेजारधर्म

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: सध्या कोरोना य विषाणुजन्य रोगाने सर्वत्रच थैमान माजले आहे. कोरोनाला दोन हात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने 21 दिवसाचा लागल डाऊन केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. मात्र असे असले तरी ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण ठप्प झाल्याने ग्रामीण भगातील नागरिकांना जीवनावश्यक गरजांसाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्यास गोरगरीब जनतेसमोर गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याने या समस्यांवर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द काही शेतकऱ्यांनी शेजारधर्म पाळत गावामधील 209 व वाड्यावस्त्यांवरील 46 गरजू कुटुंबांना अंदाजे 1 टन भाजीपाल्याचे मोफत वाटप केलेय.

सध्या शेतात निर्माण केलेला शेतमाला विक्री करण्यासाठी व्यापारी मिळत नसल्यामुळे विक्री व्यवस्था थंडावली आहे. तर काही ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठीकाणी जावयास दळणवळण सुविधा बंद केल्या असून संचार बंदी खाली मज्जाव करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांचे मोठे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्याने वतकुटे खुर्द येथील रोटरी क्लब आँफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेज या संघटनेच्या माध्यमातून कांदा,घेवडा,शेवगा,टोमॕटो,भोपळा,ढोबळी मिरची,कारले अशा प्रमुख भाज्या मोफत वाटप करण्यात आल्या.

हा संपुर्ण भाजीपाला वरकुटे खुर्द गावातील दानशुर शेतकऱ्यांनी मोफत व स्वखुशीने वाटप केला आहे. कोरोना या जगावतील संकटाशी सर्व मिळून आपण सामना करणार आहोत.म्हणून अशा वेळी कोणीही उपाशी रहावयास नको म्हणून आम्ही ही भुमिका घेतली असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगीतले. कोरोना हा रोग अत्यंत भंयकर आहे.घरातून कोणत्याही परिस्थितीत बाहेर न पडता अनोळखी माणसांच्या संपर्कात येऊ नका.प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा. असे आवाहन देखील यावेळी रोटरी क्लब आँफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हिलेज या संघटनेच्या वतीने करण्यात आले.

गावचे ग्रामविकास अधिकारी मरगळ,गांव कामगार तलाठी करगळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष शशिकांत शेंडे, सचिव संजय म्हस्के,बापुराव शेंडे,राजेंद्र भोंग,शिवाजी शेंडे व अनेक युवक कार्यकर्ते यांचे या सामाजिक उपक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले.लाभार्थी कुटूंबांनी या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button