Pandharpur

कु. कल्याणी प्रक्षाळे हिचा राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराने सन्मान

कु. कल्याणी प्रक्षाळे हिचा राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थिनी कल्याणी प्रक्षाळे हिचा सन २०१५-१६ मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना एसएससी बोर्ड पुणे यांच्याकडून दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग अंतर्गत राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व पाच हजार रकमेचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार येथील लोकमान्य विद्यालयांमध्ये देण्यात आला.
सदरचा पुरस्कार मुख्याध्यापक डिंगरे, शिक्षण मंडळ सभापती रेणुका घोडके यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी सभापती विवेक परदेशी, अभय आराध्या, अरुण लोंढे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याणी प्रक्षाळे हिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे हे दरवर्षी एससी, एसटी,ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एसएससी मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा समाजकल्याण विभागामार्फत शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व पाच हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. सन २०१५-१६ चा पुरस्कार हा पंढरपूर येथे कल्याणी हरी प्रक्षाळे यांना देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना कल्याणी प्रक्षाळे म्हणाल्या की शिक्षणाची आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीत असून यासाठी मला शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. सध्या मी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमध्ये कॉमर्स च्या शेवटच्या वर्षाला असून पुढेही शिक्षण घेऊन आधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button