अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस १४ वर्षे सक्तमजुरी
रजनीकांत पाटील
जळगाव ::> किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने ११ वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीस ९ सप्टेंबर राेजी न्यायालयाने दोषी धरले होते. या आरोपीस १४ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावण्यात आली.
सुभाष हरचंद महाजन (वय ५५, रा.वाडे, ता. भडगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश कटारियांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज झाले. पीडितेच्या वडिलांनी भडगाव पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून कलम ३७६ (२) (आय) (एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल होता. सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी काम पाहिले.






