प्रतिनिधी :
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील महाविद्यालयीन तरुणीवर गावातील 3 नराधमांनी अत्याचार करून त्या नंतर त्या तरुणीला विष प्राशन करून अज्ञात ठिकाणी सोडून दिले त्या नंतर उपचार सुरू असताना त्या तरुणीला आपला जीव गमावला लागला…
अभाविप अमळनेर शाखेच्या कार्यकर्त्यांनी पिडीत तरुणीच्या घरी भेट दिली व परिवाराचे सांत्वन केले त्या नंतर घडलेल्या घटनेची माहिती पीडित तरुणीच्या आई ने दिली..
त्या नंतर अभाविप च्या वतीने पारोळा पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून झालेल्या प्रकरणाची निःपक्षपाती पणे चौकशी करण्यात यावी व दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले
उपस्थित कार्यकर्ते
प्रगती काळे – जिल्हा विद्यार्थीनी प्रमुख
निलेश पवार – प्रदेश कार्यकारणी सदस्य
हर्षाली सोनार
केशव पाटील
पवन सातपुते






