Pandharpur

पंढरपूर शहर पोलीसांनी तब्बल 25 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला

पंढरपूर शहर पोलीसांनी तब्बल 25 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला

रफिक आतार

पंढरपूर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी समोर आली 25 लाखाचा गुटखा आणि मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने पोलिसांच्या हाती लागला आहे पोलिसांनी पकडून ठेवलेल्या सागर दत्तात्रय महाजन, रा. नागझरवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद व रविंद्र रामचंद्र दिवार, आळंद मातोबा, ता. हवेली, जि. पुणे याचेकडून वाहन क्र. एमएच 13 एसएफ 4146 व एमएच 12 क्यूं डब्ल्यू 0857 या वाहनातून विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम सुगंधित तंबाखू इत्यादींचा एकूण 25,17,600/- किमतीचा साठा अन्न पदार्थांच्या विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याचे आढळुन आला आहे .

सदर साठा जप्ती पंचनामा करून सील करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी वाहन चालक सागर दत्तात्रय महाजन, रविंद्र रामचंद्र दिवार, योगेश काळभोर (साठा मालक), विष्णू प्रजापत(वाहन मालक), निलेश काळभोर (वाहन मालक) यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३,३२८, 34 प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर येथे सदर आरोपी प्रतिबंधित साठा कोठून आणला, कोणाला देणार होते, अजून कोठे साठा करून ठेवला आहे का, या व्यवसायातील भागीदार कोण आहे का याची माहिती मिळणे करिता पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे पण अन्न भेसळ प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या गुटखा माफियांना पैसा कमवायचा पडला आहे का असे नागरिकांमधून प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button