Pandharpur

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी बरखास्त-प्रदेश कार्याध्यक्ष संजयबाबा शिंदे

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी बरखास्त-प्रदेश कार्याध्यक्ष संजयबाबा शिंदे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर राष्ट्रीय चर्मकार महासंघ या संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून चर्मकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे अशी भूमिका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बबनरावजी घोलप तसेच प्रदेश कार्याध्यक्ष संजयबाबा शिंदे यांची आहे. तीर्थक्षेत्र दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यात व शहर पदाधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हाध्यक्ष दत्तानाना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती परंतु पंढरपूर तालुक्यातील व शहरातील पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्याकडे व संघटनेच्या ध्येय धोरणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंढरपूर तालुका व शहराची तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करून लवकरच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे व जिल्हाध्यक्ष दत्तानाना बनसोडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी बरखास्त-प्रदेश कार्याध्यक्ष संजयबाबा शिंदे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button