सेवेतून तात्काळ कमी केल्याने शिक्षकांचे आमरण उपोषण सुरूच. *उपोषणाचा तिसरा दिवस* शिक्षण सभापतीचे चौकशी आदेश….
जितेंद्र गायकवाड
जळगाव,दि.१६ मार्च,जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील झिपरू अण्णा प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षकांना 9 महिन्यापासून तात्काळ कमी केल्याने चार शिक्षक व महिला शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असे उपोषण कर्त्यांनी सांगितले
आज दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता जी. प. शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील व शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषण कर्त्या शिक्षकांची बाजू ऐकून घेतली व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे . उद्या दिनांक 17 मार्च रोजी चौकशी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी शिक्षण सभापती पाटील यांनी दिले.संस्थाचालक मुख्याध्यापक सौ सुरेखा वेळ येवले यांनी केलेल्या कार्याच्या विरुद्ध न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण कायम राहणार आहे.यावेळी आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षकेतर महासंघ शिक्षक भारती संघटना , महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ, शिक्षक भारती शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई बारी यांनी उपोषण कर्त्याना पाठिंबा दिला .तसेच मोलाचा पाठिंबा देणारे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आर के पाटील यांनी आज तिसऱ्या दिवशी भेट दिली.






