Bodwad

बोदवड येथील नाभिक बांधवांचे तान्हाजी चित्रपटातील भावना दुखावणारे दृष्य वगळणे बाबत निवेदन …

बोदवड येथील नाभिक बांधवांचे तान्हाजी चित्रपटातील भावना दुखावणारे दृष्य वगळणे बाबत निवेदन …

सुरेश कोळी

बोदवड.दि.०१/०२/२०२० रोजी बोदवड तालुका नाभिक समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.दि.१०जानेवारी २०२० ला ‘तान्हाजी ‘हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता अजय देवगण, दिग्दर्शक ओम राऊत ,लेखक प्रकाश कापडिया आहेत. या चित्रपटात नाभिक समाजाविषयी ‘चुलत्या’ नावाचे नकारात्मक व काल्पनिक चित्रण आलेले आहे. या चित्रणातील चित्रपटातील शूरवीर तानाजी मालुसरे,छत्रपती शिवाजी राजे यांच्याविषयी सर्व नाभिक समाजबांधवांना आदर आहे..परंतु या चित्रपटातील चुलत्या हे पात्र इतिहासात कुठेही उल्लेख नसतांना टाकलेले आहे..या पात्रातील व्यक्ती नाभिक समाजाची असल्याचे दाखविले आहे.ही व्यक्ती चुगलखोर दाखविली आहे,त्यामुळे नाभिक समाजाविषयी चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो. यामुळे नाभिक समाजाचा अपमान झालेला आहे,समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

नाभिक समाजबांधव हे नेहमीच सत्याच्या व न्यायाच्या बाजूने उभे राहणारे आहेत.नाभिक समाजातील शूरवीर जिवाजी महाले,वीर शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यासाठी आपले प्राणांचे बलिदान दिले. बोदवड नायब तहसीदार यांना निवेदन दिले असून निवेदनातून चित्रपटातील चुलत्या नामक काल्पनिक पात्राचे चित्रण चित्रपटातून वगळावे अशी मागणी नाभिक समाजाकडून करण्यात येत आहे ,न वगळल्यास समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल. समस्त नाभिक समाजबांधव या काल्पनिक चित्रणाचा निषेध करीत आहेत..व एक दिवस काळ्या फिती लावून काम करणार आहे.यावेळी बोदवड तालुका नाभिक महामंडळ अध्यक्ष विवेक वखरे,उपाध्यक्ष गोपाळ बोरसे,सचिव गणेश सोनोने,कार्याध्यक्ष राजेंद्र बाभुळकर,दुकानदार संघटना अध्यक्ष अनिल कळमकर,उपाध्यक्ष धनराज शेळके, प्रकाश बाभुळकर,नितीन आमोदकर ,सोपान महाले हे नाभिक समाजबांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button