Pandharpur

आंतराष्ट्रीय अॉनलाईन संगीत स्पर्धेचे आयोजन अमेरिका,श्रीलंका,युरोप,न्यूझीलंड,अफ्रिका,नेपाळ, जपान देशातील विविध संस्थांचा सहभाग विकास पाटील यांचा संगीत क्षेत्रासाठी आदर्श उपक्रम..

आंतराष्ट्रीय अॉनलाईन संगीत स्पर्धेचे आयोजन अमेरिका,श्रीलंका,युरोप,न्यूझीलंड,अफ्रिका,नेपाळ, जपान देशातील विविध संस्थांचा सहभाग विकास पाटील यांचा संगीत क्षेत्रासाठी आदर्श उपक्रम..

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : संपूर्ण जगभरात आपल्या संगीत शिक्षणातून
असंख्य विद्यार्थी घडविनारया पंढरपुरातील कलापिनी संगीत विद्यालयाच्या वतीने आंतराष्ट्रीय अॉनलाईन संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी प्रायोजक म्हणून सियारशी कलाकेंद्र, श्रीलंका, मदन ओक शततंत्री मिडिया अमेरिका, आयुर्वेद डॉक्टर अरूणा पत्की, अमेरिका, हिंदू स्वयंसेवक संघ, जपान, टेम अफ्रिका, सरगम स्कूल अॉफ इंडियन म्यूझिक, न्यूझीलंड,फलैचा संगीत अभियान, नेपाळ, टोकियो टायटन्स क्रिकेट क्लब, जपान, यासोबत भारतातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे, आय कॅन ट्रेनिंग सेंटर, पंढरपूर व संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पुढाकार घेतला आहे. हि स्पर्धा लहान व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे. यासाठी विविध अर्थिक बक्षीसे ठेवण्यात आली आहे. गायन, वादन व नृत्य विषयांच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे. 15 जूनपर्यंत या स्पर्धेसाठी विडियो पाठवायचे असून विडियोसाठी 5 ते 7 मिनिटांचा मर्यादित कालावधी आहे. 21 जून रोजी जागतिक संगीत दिवशी कलापिनी संगीत विद्यालय यांच्या फेसबुक पेजवरुन याचा अंतिम निकाल सांगितला जाणार आहे. सुप्रसिद्ध जेष्ठ तबलावादक व आदर्श गुरू पं दादासाहेब पाटील,युवापिढीतील सुप्रसिद्ध युवा तबला वादक अविनाश पाटील यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभत आहे.यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी, कलाकारांनी,कलाप्रेमींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धेचे नियोजक व आयोजक विकास पाटील ( +917875776067) यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button