जनावरांना लपी स्क्रीनचा प्रादुर्भाव 23 आगस्ट धानोली इथे जनावरांनावर प्राथमिक उपचार
कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना तालुक्यात धानोली तांडा परिसरात जनावरांना लपी स्क्रीनचा डीजे यांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे धानोली इथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात प्राथमिक उपचार जनावरे चा करण्यात आले. यावेळी डाँ कडमकर डाँ तिनखेडे डाँ बागडे
सरपंच विजय रणदिवे विशाल राठोड चंद्रभान किनाके सर महादेव मडावी ओम पवार नारायण राठोड बंडुजी मडावी भीमराव जाधव सुरेश किनाके उरकुडा कुडसगे प्रकाश किनाके आदी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सरपंच रणदिवे यांनी जनावरांच्या पूर्ण अंगावर गोल आकाराच्या गाठी येतात व शरीरावर सूज येत आहे एका जनावरापासून अनेक जनावरांना हा आजार होत असल्याचे दिसत आहेत संसर्गजन्य आजार होत आहेत यातच शेतकऱ्याच्या बैल मुर्तू होण्याची शक्यता असून संसर्ग वाढत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधे ग्रामीण भागात उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली जात आहेत धानोली परिसरात शेतीबरोबरच पशुपालन करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. दुधाचे उत्पादन तसेच शेतीसाठी बैल आवश्यक असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडे दोन–चार जनावरे असतात त्यांचे खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात पशुधनाचा ही मोठा वाटा असतो परंतु गत काही दिवसापासून परिसरातील पशुपालकास समोर नवे संकट उभे राहिले आहेत कोरोना संसर्गाने सर्व जण हैराण असताना आता जनावरांना स्क्रीन नावाच्या आजारांचा संसर्ग होत आहेत जनावराच्या अंगावर गाठी येऊन तुजेत आहेत हा आजार झालेली जनावरे चारा ही खात नाही शेतकऱ्याची पशुधन महत्त्वाचे असते प्रशासनाने या गंभीर आजाराची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आजारापासून जनावराचे रक्षण करणारी अथवा प्रभावी औषधे उपलब्ध करून द्यावी असे मत व्यक्त केले तसेच अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती सेवा देणारे डाँ यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
बैलाच्या अंगावर पंधरा दिवसापासून मोठ्या गाठी आलेल्या आहेत त्या कमी व्हाव्यात यासाठी उपचार केले परंतु अद्याप फरक पडलेला नाही यापूर्वी असा आजार जनावरांना झाला नव्हता व वैद्यकीय विभागाने गावोगावी याबाबतची तपासणी करून जनावरांवर उपचार करावेत तसेच प्रतिबंधक यासाठी मार्गदर्शन करावे
विजयजी रणदिवे
शेतकरी धानोली
जनावराच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात व सूज येते आलं की स्क्रीन त्वचा रोगांचा प्रकार आहे असा आजार आढळलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे या आजारावरील प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली परत धानोली गावांत लसीकरण करू असे सांगितले
डाँ कडमकर
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी






