?️अमळनेर कट्टा..मारवड पोलिसांची धडक कार्यवाही…हात भट्टीचे 4 अड्डे उध्वस्त..अमळनेर येथील मारवड पोलिसांनी दबंग कार्यवाही करत हात भट्टीचे अड्डे उध्वस्त केले आहेत. मारवड हद्दित डाॅ.बाबासो आंबेडकर जयंती निमित्त गस्त करत असतांना श्री राकेश जाधव सो उविपोअ अमळनेर यांचे मार्गदर्शन नुसार प्र.डांगरी येथे सकाळी दोन गावठी हात भट्टी वर कार्यवाही केली आहे. यात रतीलाल भोई या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.हातभट्टी वर सुमारे 2400/- रु ची 80 लिटर हातभट्टी ची दारू व इतर साहित्य उश्वस्त करण्यात आले आहे.याच गावात भैया भोई ह्याच्या कडून प्लास्टिक ड्रम मध्ये 2700/-रु ची 90 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.तर शेवटची बातमी हाती आली तेंव्हा हिंगोणे बुद्रुक येथे दोन हातभट्टी वाले यांचेवर कार्यवाही सुरू होती.मुद्देमाल जप्त करणे,आरोपी ताब्यात घेणे इ कार्यवाही सुरू होती. आज एकुण चार दारुबंदीच्या केसेस केल्या आहेत. पुढील कारवाई करत आहोत.
या पथकात सपोनि राहुल फुला,सफौ पवार, सफौ पाटील, पोहवा संजय मकडू पाटील, पोहवा होळकर, पोना सुनील तेली,पोना साळुंखे,पोना आगोणे, होम मनोज पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील यांचा समावेश आहे.






